
रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात
पनवेल : राज भंडारी
काही तरी वेगळं करणारी माणसं हे वेगळी असतात त्यांचे ध्येय, तत्व, विचार जरा हटके असतात, त्यामध्ये असे व्यक्तीमत्व असणारे करंजाडे ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर माजी सरपंच रामेश्वर आंग्रे. काही व्यक्तींच्या रक्तातच मुळात लढवय्यापणा आणि संघर्ष करण्याची मोठी ताकद असते. त्यामुळे अशी मंडळी आव्हानाला आव्हान देऊन पुढे जातात. त्याप्रमाणे त्यांना उदंड आयुष्य लाभावं, ते नगरसेवक व्हावेत असे मत येथील ग्रामस्थांनी19 जुलै रोजी त्यांच्या वाढदिवसानिमिताने व्यक्त केले.
करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस आरोग्य शिबीर व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी एमजीएम रुग्णालय कामोठे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५० शिबिरार्थींनी लाभ घेतला. यावेळी बोलताना रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले की, माझा ५० वा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करताना आनंद होत आहे, कारण लहान आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने मला शैक्षणिक साहित्य भेट देताना आनंद होतो, त्याचबरोबर नागरिकांच्या आणि रुग्णांच्या हितासाठी मला आरोग्य शिबीर तथा रक्तदान शिबिरासारखे महत्वाचे कार्य करता आले. गेल्या अनेक वर्षांपासूनचे माझ्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी कार्यक्रम पार पडत आहेत आणि यापुढेही ते असेच अविरतपणे सुरु ठेवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.