logo

नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात पालक सभा संपन्न

जि. जळगांव अडावद ता. चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 19 जुलै 2025 वार शनिवार रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष विद्यार्थी हितासाठी कार्यतत्पर असणारे मा श्री डॉ केदारजी थेपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालकांचे योगदान महत्त्वाचे आहे म्हणून पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर जे पवार सर अध्यक्षस्थानी होते. मंचावर उपमुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर, पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर ज्येष्ठ शिक्षक श्री व्ही एल राठी सर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस आर बोरसे मॅडम व पालक बंधू भगिनी उपस्थित होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर यांनी पालकांना संबोधित करताना विद्यालयाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती करून दिली. नव्याने प्रवेशित, गैरहजर राहणारे विद्यार्थी, जे अप्रगत आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्गांची व्यवस्था करण्यात आली आहे, स्कॉलरशिप, नवोदय यासारख्या परीक्षांसाठी विद्यालयामार्फत मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आम्हाला पालकांची साथ हवी आहे असे सांगितले. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर पालकांना मार्गदर्शन करताना आम्ही सर्व योजना विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबवित असून आमचे संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी त्यासाठी कटिबद्ध आहेत असे सांगितले. ज्येष्ठ शिक्षक श्री व्ही एल राठी सर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना आम्ही मुलांच्या प्रगतीसाठी सर्वतो परी प्रयत्न करू परंतु त्यासाठी पालकांची साथ हवी असे सांगितले.त्यानंतर पालकांमधून शैक्षणिक वर्ष 25 -26 साठी शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली. या संघाचे अध्यक्ष विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक असून उपाध्यक्ष म्हणून पालकांमधून श्री महेश भाऊ गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. या सभेला श्री जगदीश भाऊ सोळंके, श्री संजय भाऊ शिंपी, श्री भूषण भाऊ मगरे,सौ नितलताई बाविस्कर, सौ कोमलताई पवार यांच्यासह बहुसंख्य पालक बंधू भगिनी उपस्थित होते. त्यानंतर सखी सावित्री समिती, माता पालक समिती, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती या समितीचे देखील कामकाजाविषयी माहिती करून देण्यात आली. शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री महेश भाऊ गायकवाड यांचा शॉल व बुके देऊन सत्कार करण्यात आला तर सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे बुके देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. शिक्षक पालक संघाचे सचिव विद्यालयाचे उपशिक्षक श्री सी जी परदेशी सर यांनी सर्व पालक बंधू भगिनी यांचे आभार मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य मिळाले.

25
1693 views