
२७ जुलै २०२५ रोजी कोकणकरांची महासभा — जनआक्रोशाचा बुलंद आवाज...
प्रतिनिधी. अनिकेत मेस्त्री
मुंबई, दादर – २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता गावस्कर सभागृह, दादर (पूर्व), मुंबई येथे कोकणकरांची महासभा आयोजित करण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या दिरंगाईविरोधात, तसेच कोकणातील मूलभूत प्रश्नांवर एकजूट निर्माण करण्याच्या हेतूने ही सभा घेण्यात येत आहे.
या सभेत मुंबई-गोवा महामार्ग अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे कोकणातील जनतेला होणाऱ्या त्रासावर, अपघातांवर, आणि विकासकामांमधील विलंबावर खुली चर्चा होणार आहे. यामध्ये जनआक्रोश समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, स्थानिक नेते, पत्रकार, विद्यार्थी तसेच कोकणातील असंख्य जागरूक नागरिक सहभागी होणार आहेत.
सार्वजनिक कामांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व, आणि वेळेवर काम पूर्ण करण्याची मागणी हा या सभेचा मुख्य उद्देश आहे. कोकणच्या विकासासाठी आणि हक्कासाठी लढणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे.
सभेच्या आयोजनामध्ये जनआक्रोश समिती, कोकण विकास मंच, आणि इतर अनेक सामाजिक संस्था सक्रीय सहभागी आहेत.
प्रमुख मुद्दे:
मुंबई-गोवा महामार्गाचे अपूर्ण काम
शासकीय निष्काळजीपणाविरुद्ध आवाज
स्थानिक नागरिकांच्या मागण्या व समस्या
पुढील आंदोलनाची दिशा
सभेची वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी २:००
स्थळ: गावस्कर सभागृह, दादर (पूर्व), मुंबई
कोकणप्रेमी, समाजहितद्रष्ट आणि सामान्य नागरिकांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.