
लोणंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – 15 हरवलेले मोबाईल तक्रारदारांच्या हाती सुपूर्द!
लोणंद /
मोबाईल किंमत – ₹3,07,499/- | एकूण मोबाईल – 15
सदर मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले!
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध तक्रारदारांचे हरवलेले मोबाईल पोलिसांनी अत्यंत चिकाटीने आणि तांत्रिक माध्यमांचा वापर करून पुन्हा मिळवले. सदर कारवाई जून व जुलै 2025 दरम्यान यशस्वीरीत्या पार पडली.
या मोहिमेचे मार्गदर्शन खालील मान्यवरांनी केले:
मा. तुषार दोषी (सो.), पोलीस अधीक्षक, सातारा
मा. श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा
मा. राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग
श्री. सुशिल बी. भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, लोणंद पोलीस ठाणे
या यशस्वी मोहिमेसाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. सीआयआर पोर्टल आणि तांत्रिक पद्धतींचा वापर करून महाराष्ट्र व इतर राज्यांतील नागरिकांशी संपर्क करून मोबाईल मिळवले गेले.
कार्यवाहीत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
पो.उ.नि. ज्योती चव्हाण, सहा.फौ. विजय पिसाळ, धुमाळ, पो.हवा नितीन भोसले, संतोष नाळे, धनाजी भिसे, पोहवा अतुल कुंभार, मिसाळ, पोना सतीश दडस, बापुराव मदने, पोकों विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, शेखर शिंगाडे, सुनिल नामदास, यादव, गोविंद आंधळे, सचिन कोळेकर, केतन लाळगे, अमिर जाधव, सुरज सार्वत, मपोकों स्नेहल कापसे, राणी कुदळे यांचा मोलाचा सहभाग होता.
या यशस्वी मोहिमेमुळे तक्रारदारांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
सहा. पोलीस निरीक्षक श्री. सुशिल बी. भोसले यांनी सांगितले की,
*"ही मोहीम यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे, नागरिकांनी मोबाईल गहाळ झाल्यास तत्काळ तक्रार करावी अशी विनंती करण्यात आली