साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची जोरदार मागणी –
मातंग एकता आंदोलनाच्या उपक्रमाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा
शौकत शेख
पुणे | प्रतिनिधी दिनांक १८/०७/२०२५
साहित्य, समाजप्रबोधन आणि क्रांतिकारी विचारांचे महान द्योतक डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची जोरदार मागणी मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड कडून ठाम पाठिंबा देण्यात आला असून, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
आंदोलकांनी सरकारला इशारा दिला की, १ ऑगस्ट २०२५ पूर्वी डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर झाला नाही, तर महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी संघटनांना एकत्र करून मंत्रालयावर भव्य मोर्चा नेण्यात येईल.
या वेळी मान्यवर उपस्थिती:
अविनाश बागवे, माजी नगरसेवक
दिगंबर जोगदंड, मातंग एकता आंदोलन, पुणे जिल्हा उपाध्यक्ष
चंद्रशेखर घाडगे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे
साजिद सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
तसेच चळवळीतील विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.