logo

नागपूर महानगर पालिका हद्दीतील रिकाम्या प्लॉट मध्ये घाण आणि पावसाचे पाणी साठून घाण आणि मच्छरांचा प्रकोप

नागपूर महानगर पालिका, नागपूर हद्दीतील रिकाम्या प्लॉट मध्ये घाण आणि पावसाचे पाणी साठून घाण आणि मच्छरांचा प्रकोप झाला आहे तो निस्तारण्याबाबत महानगर पालिका आयुक्त यांनी जातीने लक्ष द्यावे. टेलिफोन नगर, नरसाळा रोड, उमरेड रोड लगत नागपूर येथे प्लॉट नं. २४, २५ आणि २६ हे सलग लागून असलेले प्लॉट अनेक वर्षांपासून रिकाम्या अवस्थेत आहे. त्यामुळे रिकामा प्लॉट हा परिसरातील नागरिकां करिता कचरा घर झालेले आहे. त्या परिसरात गुरुवारी आठवडी बाजार भरतो आणि रात्री राहिलेला भाजीपाला हा त्या रिकाम्या प्लॉटवर टाकण्यात येतो. तसेच झाडांचा सुद्धा झुडपी जंगलाचे स्वरूप त्या प्लॉटला आलेले आहे. त्यामुळं आजुबाजूच्या घरातील नागरिकांना व आम्हाला खूप जास्त त्रास होत आहे. परिसरात मच्छरांचा प्रकोप भयंकर झाला असून घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले असून घराघरात रुग्ण झालेले आहे. आपणांस विनंती आहे कि याकडे लक्ष देऊन हि समस्या सोडविण्यात यावी. ज्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न मिटेल. महानगर पालिका आयुक्त निवेदन आहे कि समस्येवर लवकरात लवकर समाधान काढण्यात यावे. नागपुरात असे अनेक प्लॉट जागोजागी असून त्यावर अशाप्रकारची घाण साचलेली असते त्याकडे मनपा चे दुर्लक्ष असून मनपा फक्त कर आकारण्याचे काम करते कि काय, असा नागरिकांना प्रश्न पडलेला आहे. याकडे आयुक्तांनी जातीने लक्ष देऊन नागरिकांना यापासून सुटका मिळेल असे पाऊल उचलण्यात यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

1
67 views