logo

खत तुटवड्याकडे लक्षवेधन्यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर काँग्रेसचा आज घंटानाद

कृषी अधीक्षक कार्यालयासमोर काँग्रेसचा आज घंटानाद
खत तुटवड्याकडे लक्षवेध

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भासणाऱ्या युरिया आणि डीएपी खतांच्या तुटवड्याकडे लक्ष वेधण्यासोबत शेतकऱ्यांच्या इतर समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस आज घंटानाद आंदोलन करणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयापुढे दुपारी 3 वाजता होणाऱ्या या आंदोलनात पुरामुळे वाहून गेलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, दुबार पेरणीसाठी उत्तम दर्जाचे बियाणे पुरवावे, अनेक ठिकाणी बोगस बी-बियाण्यांचा सुळसुळाट झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. त्या विक्रेत्यांना काळ्या यादीत टाकावे. खत विक्रेते लिंकिंग करून खतासोबत इतर वस्तू खरेदी करण्यासाठी भाग पाडत आहेत. हा प्रकार तत्काळ थांबवावा अशी मागण्या यावेळी केल्या जाणार आहेत.

या आंदोलनात शेतकरी, नागरिक आणि काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

0
108 views