"कोकणकारांची महासभा" या जनआंदोलनपर सभेस उपस्थित राहण्याबाबत विनंती
सप्रेम नमस्कार!
आपल्याला कळविण्यात अत्यंत आदर वाटतो की, मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती च्या वतीने २७ जुलै २०२५, रविवार रोजी सकाळी ११:०० वाजता, गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व) येथे "कोकणकारांची महासभा" आयोजित करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम व त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या याविषयी जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी आणि कोकणातील जनतेचे हक्क, प्रश्न आणि भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही जनआंदोलनपर सभा आयोजित करण्यात आली आहे.
आपल्यासारख्या सजग आणि जबाबदार व्यक्तीची या सभेमध्ये उपस्थिती अत्यंत महत्त्वाची ठरेल. आपल्या विचारांचे आणि मार्गदर्शनाचे आम्हाला मोलाचे बळ मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
कृपया आपण या सभेस उपस्थित राहून कोकणवासीयांच्या लढ्याला बळ द्यावे, ही विनंती.
आपले कृपाभिलाषी
मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती.