
नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात, इको क्लब च्या साह्याने वृक्षारोपण संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी/ दिनेश सोनवणे / नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अडावद ता चोपडा जि जळगांव येथे दिनांक 17 जुलै 2025 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर जे पवार सर, उप मुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर, पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमधून इको क्लब ची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर जे पवार सर होते. तर मंचावर पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर, श्री के एस सावकारे सर, श्री टी डी पाटील सर, श्रीमती एस आर बोरसे मॅडम, सौ एम एन भारुडे मॅडम, श्रीमती कीर्ती पाटील मॅडम, श्रीमती के व्ही पाटील मॅडम, श्रीमती एच एस सपकाळे मॅडम उपस्थित होते. विद्यालयाचे उपशिक्षक इको क्लब चे समन्वयक श्री सी जी परदेशी सर यांनी शासनाच्या इको क्लब स्थापना मागील उद्देश, इको क्लबचे कार्य, विद्यार्थ्यांनी वर्षभरात करावयाची कामे याविषयी माहिती करून दिली. शासनाची एक पेड मा के नाम योजनेबद्दल माहिती दिली. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के आर कनखरे सर यांनी विद्यार्थ्यांना इको क्लब बद्दल मार्गदर्शन केले. यानंतर शालेय आवारात मुख्याध्यापक श्री आर जे पवार सर, पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस आर बोरसे मॅडम, इको क्लबचे सदस्य श्री सी जी परदेशी सर व श्री के एस सावकारे सर, श्री टी डी पाटील सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री एस डी खोडपे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इको क्लब मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी यांचे सहकार्य मिळाले.