पाचोरा : पाचोरा रोटरीचे क्लब ची जोरदार वाटचाल एका दिवसात चार उपक्रम संपन्न
पाचोरा : पाचोरा रोटरीचे क्लब ची जोरदार वाटचाल एका दिवसात चार उपक्रम संपन्न
रोटरी क्लब पाचोरा भडगाव ने एका दिवसात बुऱ्हानी इंग्लिश मेडीयम स्कुल पाचोरा, गुरुकुल स्कुल पाचोरा तसेच आदर्श विद्यालय पाचोरा येथे दहावीच्या सुमारे 200 विद्यार्थी साठी महत्वाचे अँप तसेच जिल्हा परिषद कन्या शाळा येथे सुमारे 70 विद्यार्थी विद्यार्थिनी यांना दप्तर वाटप केले. डॉ किशोर पाटील आणि सौ प्रिया पाटील यांनी सर्वं विद्यार्थ्यांना दप्तर भेट दिले. यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, डॉ किशोर पाटील, डॉ प्रशांत सांगडे, डॉ सिद्धांत तेली, संजय कोतकर, चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, अरुणा उदावंत, प्रा वैशाली बोरकर यासोबत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी
विद्यार्थिनी,पालक उपस्थित होते. दप्तर भेट मिळाल्यानंतर सर्वं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता