logo

अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेने च्या वतीने चर्मकार समाजाचे विविध मागण्यासाठी निवेदन

छत्रपति संभाजी नगर येथे अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेने च्या वतीने माननीय विभागीय आयुक्त आणि मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले।
या निवेदना द्वारा संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाचे बजट 3000 कोटी पर्यंत वाढवुन देण्यात यावे तसेच 50 लाख रुपए पर्यंत कर्ज वाटप झाले पाहिजे।
महाराष्ट्र राज्यामधे संत रविदास यांच्या नावाने विद्यापीठ स्थापना झाले पाहिजे।
प्रत्येक जिल्हा मधे संत रविदास यांच्या नावाने सामाजिक सभागृह आमदार व खासदार निधि तुन बांधण्यात आले पाहिजे।
चर्मकार समाज च्या मुलांची शालेय शिष्यवृत्ती वेळेवर मिळाली पाहिजे व शिष्यवृत्ती वाढवुन दिली पाहिजे।
संत शिरोमणि गुरु रविदास इतिहास संशोधन केंद्र महाराष्ट्रत छत्रपति संभाजी नगर येथे स्थापना झाले पाहिजे।
अश्या इतर अनेक विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आमच्या मागण्यां मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशनात तीव्र आंदोलन अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेने च्या वतीने करण्यात येईल।
यावेळी संस्थापक अध्यक्ष देविलाल बिरसोने सोबत रामचंद्र सुकटे, नितिन लसगरे, प्रवीण बोरुडे, किशोर रईवाले,कडुनाथ विटोरे आणि संदिप लसगरे हे पदाधिकारी उपस्थित होते

0
266 views