logo

खंडागळे हॉस्पिटलची अवैध गर्भपाताच्या संशयावरून तपासणी.

खंडागळे हॉस्पिटलची अवैध गर्भपाताच्या संशयावरून तपासणी.

AIMA NEWS NETWORK
रायपूर : बुलढाणा तालुक्यातील रायपूर स्थित
खंडागळे हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात होत असल्याच्या संशयावरून आरोग्य विभागाने शनिवारी (दि.१२) अचानक तपासणी केली. मात्र, तपासणीत कोणतीही बेकायदेशीर बाब आढळून आली नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी 'पत्रकारांशी' बोलताना दिली.

डॉ. प्रकाश खंडागळे यांनी रायपूर गावातच खाजगी हॉस्पिटल सुरू केले असून, गोर गरीबांचे ते एक दम कमी मूल्यात उपचार करून ते एका प्रकारची सामजिक सेवाकरतात या सेवेत त्यांच्या डॉक्टर मुलांचाही सहभाग या रुग्णालयाच्या कामकाजात आहे. अलीकडे या रुग्णालयात अवैध गर्भपात केले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर, जिल्हा शल्यचिकित्सकांनी पथकासह तपासणी मोहीम राबवली. यावेळी चिखली येथील स्त्रीरोगतज्ज्ञ व अधिनस्थ कर्मचारी यांच्यासोबत संपूर्ण रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. या मोहिमेसाठी पोलिसांचादेखील बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, तपासणीत फक्त नियमित प्रसूती सेवा सुरू असल्याचे आढळले.

"अवैध गर्भपात होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर खंडागळे हॉस्पिटलमध्ये मी स्वतः आणि पथकासह तपासणी केली. तेथे फक्त प्रसूती सेवा सुरू असल्याचे दिसून आले. गर्भपातासंदर्भात कोणतीही निश्चित बाब आढळून आली नाही".

*डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा शल्यचिकित्सक*

आढळून आली नाही. तपासणीत काहीही आढळून आले नसले तरी कारवाई झाल्यामुळे गावात चर्चेला उधाण आले.

25
741 views