logo

शेवगाव बस स्थानकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव

अहिल्यानगर :अहिल्यानगर येथील शेवगाव बस स्थानकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मान्यता दिली आहे. अहिल्यानगर युवासेना जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री भेट घेऊन शेवगाव येथील नवीन बस स्थानकाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची विनंती केली होती. या कार्याला विशेष असे योगदान किरण साळी (युवासेना राज्य सचिव महाराष्ट्र) यांचे लाभले आहे. या विनंतीला मान देऊन प्रताप सरनाईक यांनी या प्रस्तावावर कार्यवाही करण्याची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळालासांगितले आहे तरी लवकरच शेवगाव बस स्थानकाला अधिकृतपणे "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक असे नाव देण्यात येईल. युवासेना जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट यांनी स्थानिक नागरिकांच्या भावना आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी ही मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोर मांडली होती. छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान
लक्षात घेऊन हे नाव स्थानकाला देण्याची मागणी जोर धरत होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागणीचे महत्त्व ओळखून तात्काळ मंजुरी दर्शवली गेली आहे. ही मंजुरी शेवगावच्या नागरिकांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. शेवगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांमध्ये साईनाथ आधाट यांच्या या प्रयत्नांमुळे आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल स्थानिक नागरिक आणि युवासेना कार्यकर्त्यांकडून साईनाथ आधाट व शिवसैनिकांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

63
2139 views