logo

तृतीयपंथीयांनाही मदतीचा हात...पुणे महापौर मुरलीधर मोहोळ

तृतीयपंथीयांनाही मदतीचा हात 

कोरोनाच्या काळात समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या सर्वांसाठी मदतकार्य आवश्यक आहे. म्हणूनच आज रोजगार उपलब्ध नसताना व पोटाचा प्रश्न असताना तृतीयपंथीयांना मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माझ्या हस्ते मदत देण्यात आली.

मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने तृतीयपंथीयांना किराणा किट व आरोग्य किट वाटप करण्यात आले.

केवळ याच काळात नव्हे तर कायमच तृतीयपंथीच्या मदतीसाठी आपण प्रयत्न करायला हवेत. तृतीपंथीयांच्या लसीकरणासाठी आपण प्रयत्नशील असून ज्यांच्याकडे आधार कार्ड वा अन्य पुरावा आहे त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यास आपली तयारी आहे.

यावेळी श्री. संदीप खर्डेकर, क्रियेटिव्ह फाउंडेशनच्या विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सोनाली दळवी, विशाल भेलके, मुकुल माधव फाउंडेशनच्या यास्मिन शेख, योगेश रोकडे इ मान्यवर उपस्थित होते.

63
24947 views