logo

श्रावण क्वीन पनवेल 2025

पनवेल : स्मार्ट मम्मी आणि इनरव्हील क्लब गॅलेक्सी नवीन पनवेल प्रस्तुत श्रावण क्वीन 2025 हा खास महिलांसाठी कार्यक्रम 12 जुलै रोजी गणपती मंदिर हॉल पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता . श्रावण क्वीन याची संकल्पना शितल ठकार यांची असून कार्यवाह प्रमुख कविता ठाकूर होत्या. या स्पर्धेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यामध्ये द्वितीय रनर अप वर्षा वाणी प्रथम रनर अप डॉ .अनुश्री डिंगोकर आणि विजेती वेदा केळकर यांनी ही स्पर्धा गाजवली.या कार्यक्रमासाठी खालील मान्यवर उपस्थित होते.
सौ . शकुंतला रामशेठ ठाकूर
सौ. अर्चना परेश ठाकूर
सौ. प्रीती जॉर्ज म्हात्रे ( नगरसेविका )
श्रीमती. माधुरी गोसावी
सौ .अनुराधा ठोकळ
सौ. दर्शना भोईर (माजी नगरसेविका )
सौ. रत्नप्रभा ताई घरत
सौ.लीना पाटील
या कार्यक्रमासाठी खास गिफ्ट म्हणून दीपक साडी यांच्याकडून सर्वांना साडी देण्यात आली तसेच प्रेरणा गायकवाड यांच्याकडून क्राऊन देण्यात आले. या कार्यक्रमाला बऱ्याच संख्येने महिला उपस्थित होत्या. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम नियमित राबवणे आवश्यक आहे असे पनवेलचे अभिनेता रत्नकांत म्हात्रे यांनी आपले मत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

37
3832 views