logo

चाळीसगावहून विशेष रेल्वेने पंढरपूरला पोहोचलेल्या माऊलींच्या पालखीने आज भूवैकुंठ पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पवित्र जलात स्नान ...!

चाळीसगावहून विशेष रेल्वेने पंढरपूरला पोहोचलेल्या माऊलींच्या पालखीने आज भूवैकुंठ पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पवित्र जलात स्नान करण्यात आले.

"सावळ्या विठ्ठलाचे दर्शन... चाळीसगावकर वारकऱ्यांसह पंढरपूरची वारी पूर्णत्वास"

चाळीसगावहून विशेष रेल्वेने पंढरपूरला पोहोचलेल्या माऊलींच्या पालखीने आज भूवैकुंठ पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पवित्र जलात स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी आमदार मंगेश चव्हाण यांची दर्शन घेतले.

वर्षभर ज्याची वाट प्रत्येक वारकरी भक्तीभावाने पाहत असतो, त्या सावळ्या विठुरायाचे आज प्रत्यक्ष दर्शन घेता आले. या पवित्र क्षणी माझ्या सोबत पत्नी सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्यासह चाळीसगाव मतदारसंघातील ४००० हून अधिक भाविकांची साथ लाभली, हे माझ्यासाठी अत्यंत भाग्याचे व अभिमानाचे क्षण ठरले.

यावेळी भगवंताच्या चरणी चाळीसगाव मतदारसंघातील जनतेच्या सुख-समृद्धीचे, बळीराजाच्या शेतातील भरघोस उत्पन्नाचे आणि सर्वांच्या आरोग्यपूर्ण, शांत, समाधानी जीवनाचे साकडे घातले.

वारी म्हणजे केवळ परंपरा नाही, ती आपल्या श्रद्धेची, सेवाभावाची आणि समर्पणाची गाथा आहे.
या भक्तिपूर्ण सेवेस सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल श्री पांडुरंग चरणी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.

8
73 views