logo

पाळधी ता. जामनेर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगार महिला- पुरुषांसाठी मोफत गृहपयोगी साहित्य संचाचे (भांडे) वाटप....!

पाळधी ता. जामनेर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगार महिला- पुरुषांसाठी मोफत गृहपयोगी साहित्य संचाचे (भांडे) वाटप करण्यात आले.
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
पाळधी ता. जामनेर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगार महिला- पुरुषांसाठी मोफत गृहपयोगी साहित्य संचाचे (भांडे) वाटप जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले पाळधी येथे भारतीय जनता पार्टी पश्चिम विभाग व ग्रामपंचायत पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ऑनलाईन शिबिरात जवळपास २००० बांधकाम कामगारांचे कागदपत्र ऑनलाइन करण्यात आले होते, सर्व बांधकाम कामगारांना भांडी वाटप चालू आहे. यावेळी उपस्थित त्यांना भाऊंनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले,
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजपा पश्चिम तालुका अध्यक्ष कमलाकर भाऊ पाटील,माजी सभापती नीता पाटील, सरपंच प्रशांत बाविस्कर राजमल भागवत, नरेंद्र माळी, ग्रा प सदस्य मनोज नेवे देवचंद परदेशी,नवल पाटील , छोटु सपकाळ,नाना सुशीर आनंदा बुवा जंजाळ,भगवान भाऊ ईगळे ,विकास भाऊ, श्रीखंडे बापू काळबंले,नाना पाटील हर्षल पाटील नाचनखेडा श्रीकांत पाटील,सोपान पाटील,अशिष दामोदर सर अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विनोद पाटील अतुल बाविस्कर विनोद कोळी जयवंत माळी, सचिन माळी हर्षल पाटील प्रल्हाद माळी, प्रवीण माळी अर्जुन अहिरे,पवन परदेशी,सागर परदेशी, रवी धनगर, राहुल पाटील,योगेश करवंदे,गोलू आपार व पाळधी गावातील तरुणांनी परिश्रम घेतले
यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कमलाकर पाटील यांनी केले.

2
239 views