
चिंचोलीत ५० खाटांच्या क्रिटिकल केअर युनिटच्या प्रकल्पाचे भूमिपूजन...
चिंचोलीत ५० खाटांच्या क्रिटिकल केअर युनिटच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
१३ जुलै २०२५
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात ५० खाटांच्या (Critical Care Unit) प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदामंत्री मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास खासदार स्मिता ताई वाघ,जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसादजी , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
या युनिटच्या स्थापनेमुळे जळगाव जिल्ह्यातील अतिदक्षता उपचार प्रणाली अधिक सक्षम होणार असून, गंभीर रुग्णांसाठी तातडीच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण व जिल्हा रुग्णसेवेतील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
नवीन क्रिटिकल केअर युनिटमुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा आणखी मजबूत होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.