शैक्षणिक मदतीसह मानुसकीचा संदेश देणारा यारी दोस्ती फाउंडेशनचा उपक्रम
दिनांक १० जुलै २०२५ रोजी यारी दोस्ती फाउंडेशन पालघर यांच्या वतीने जन्हेरा तालुक्यातील रामनगर कानतकरी पाडा येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, मानुसकीची छत्री उपक्रम, आणि एक सदस्य एक वृक्ष लागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात फाउंडेशनच्या सदस्यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य जसे की वह्या, पेन, पेन्सिल, खव, आणि चित्रकलेसाठी साहित्य वाटप केले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर "एक सदस्य एक वृक्ष" ही संकल्पना राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यारी दोस्ती ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत मानुसकीच्या छायेखाली विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात दिला. या कार्यक्रमात काही सदस्यांनी स्वतःच्या मित्रांसाठी रक्तदान करून मानवीतेचा आदर्श प्रस्तुत केला.
कार्यक्रमास शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, तसेच यारी दोस्ती ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजसेवेचा अनोखा आदर्श यारी दोस्ती फाउंडेशनने या माध्यमातून निर्माण केला आहे.