सुगंधी तंबाखू, मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त; विशेष पोलीस पथकाची कारवाई
*अहिल्यानगर*
पाथर्डी तालुक्यात सुरू असलेल्या सुगंधी तंबाखू, मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलीस विशेष पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त करण्यात आला आहे. याबाबत चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून १ लाख ३३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आला असून अभिजीत मिनीनाथ लांडे (वय-५२, रा. आनंदनगर ता. पाथर्डी), अक्षय गणेश इधाटे (रा.इंदौरानगर ता. पाथर्डी), राहुल अर्जुन सानप, सुनिल बाबासाहेब सानप (दोघे रा.तनपुरवाडी फाटा ता. पाथर्डी), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी परिसरात अवैध सुगंधी तंबाखू विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.