logo

महाराष्ट्र इमारत व अन्य बांधकाम कामगार कल्याण मंडळ (MAHABOCW)" अंतर्गत चालणाऱ्या इमारत बांधकाम प्रकल्पांमध्ये गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार सुरु आहे.

📝 भ्रष्टाचारास

कामासाठी लाच मागितली जाते – कामगार नोंदणी, नूतनीकरण, किंवा योजना मिळवण्यासाठी पैसे (₹500 ते ₹2000+) घेण्याचे प्रकार.

दलालांचे प्रस्थ – कार्यालयाच्या बाहेर व आत काही दलाल पैसे घेऊन अर्ज पुढे ढकलून देतात.


कामगारांची अडवणूक – ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांचे अर्ज जाणूनबुजून प्रलंबित ठेवले जातात.


ऑनलाईन अर्ज असूनही पैसे मागणे – प्रक्रिया ऑनलाईन असताना "अंतिम मंजुरीसाठी" प्रत्यक्ष भेट घ्या, असे सांगून पैसे उकळले जातात.


मिळालेल्या लाभाचा टक्का मागितला जातो – जेव्हा कामगाराला अनुदान/योजना मंजूर होते, तेव्हा त्यातून काही टक्का मागण्याचा प्रकार.


दस्तऐवज बनवण्यात व माहिती देण्यात फसवणूक – चुकीची माहिती देऊन अतिरिक्त पैसे घेतले जातात.


तक्रार केल्यास काम रोखले जाते किंवा धमकी दिली जाते – आवाज उठवणाऱ्यांना अडचणीत आणले जाते
काही दलाल अधिकाऱ्यांच्या संगनमताने कार्यालयाच्या बाहेर व आत सक्रिय असून, अर्ज प्रक्रिया जलद करण्याच्या नावाखाली पैसे घेतात.


ऑनलाईन अर्ज यंत्रणा असूनही ‘फायनल मंजुरीसाठी’ प्रत्यक्ष भेट आणि रक्कम देणे बंधनकारक असल्यासारखे भासवले जाते.

कामगारांना शासन निर्णयांची माहिती देण्यात टाळाटाळ केली जाते, जेणेकरून दलालांकडे पैसे देऊनच माहिती मिळावी.


शासनाने मोफत देण्याच्या सेवा सवलतीसाठी देखील पैसे मागितले जातात.


काही अधिकारी बनावट कागदपत्रांवर देखील अर्ज मंजूर करतात – हे बेकायदेशीर आहे.


तक्रार केल्यास अर्ज रखडवून ठेवले जातात किंवा अप्रत्यक्ष धमक्या दिल्या जातात.


आपल्या कार्यालयात पारदर्शकता राहावी, व गरजू कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ लाच न देता मिळावा, यासाठी कृपया खालील उपाययोजना करण्यात याव्यात:

तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

दलालांना कार्यालय परिसरात थांबण्यास बंदी घालावी.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित करावी.

तक्रारदारांची गोपनीयता राखावी.

49
3702 views