logo

जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचा परतीच्या प्रवासात आज श्रीपुर मध्ये आगमन

*जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचा परतीच्या प्रवासात आज श्रीपूर मध्ये आगमन*

*श्रीपूर*

जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या प्रवासात आज संध्याकाळी सहा वाजता श्रीपूर मध्ये आगमन झाले येथील वासुदेव पिसे यांच्या घरासमोर पालखी काही वेळ विश्रांती साठी थांबली तेंव्हा वासुदेव पिसे गजानन पिसे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आरती केली यावेळी पालखी अर्धा तास उशिरा आली होती पालखी सोहळा श्रीपूरला आल्यानंतर दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती सुरूवातीला कोणी कसेही मध्ये शिरुन दर्शन घेत असल्याने थोडा गोंधळ उडाला नंतर सर्वांना रांग लाऊन दर्शन घेण्याचे आवाहन केले तेव्हा शिस्तीत दर्शन सुरू झाले दिवसेंदिवस परतीच्या पालखी सोहळ्यात विणेकरी पताकाधारी यांची संख्या वाढत आहे अडीच हजारांहून अधिक वारकरी परतीच्या पालखी सोहळ्यात सहभागी आहेत ट्रक चालक मालक संघाचे वतीने वारकऱ्यांना मोफत चहा बिस्किटे देण्यात आली वासुदेव पिसे यांच्या घरी वारकऱ्यांना प्रसाद म्हणून शिरा भात चहा देण्यात आला या वर्षी पालखी सोहळा श्रीपूरला आल्यानंतर स्थानिक पोलीस यंत्रणा नसल्याने वहातुक व पादुका दर्शन घेण्यासाठी वाढलेली गर्दी यामुळे रहदारीवर परिणाम झाल्याने एकाच वेळी चार चाकी वहाने मोटार सायकली तसेच पालखी सोहळ्यातील वहाने यांची शिस्त हरवली होती

14
45 views