logo

सातारा- पंढरपूर रोड वर बनलाय मृत्यूचा सापळा ?

सातारा- पंढरपूर रोड वर बनलाय मृत्यूचा सापळा ?
सविस्तर
सातारा पंढरपूर रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला रोड तसेच सातारा सोलापूर जिल्ह्यास जोडणारा सोपा रस्ता म्हणून ओळख असलेला हा रस्ता प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे.
या रस्त्यावर माण तालुक्यातील म्हसवड शहर ते धुळदेव गावच्या हद्दीपर्यत रोड अतिशय धोकादायक बनलेला आहे. त्याचे कारण म्हणजे धुळदेव गावच्या जवळ अर्धवट अवस्थेत राहिलेले रस्त्याचं काम. हा पॉईंट आहे. उतारावरील त्यामुळे वाहन चालकांना पटकन लक्षात येत नाही. अन् त्यामुळे होतात हे अपघात .
रोड चे अर्धवट काम राहिल्यामुळ कोणतीच ठोस उपाय योजना या ठिकाणी कोणीही करताना दिसत नाही. सदर जागा धुळदेव गावाजवळ असली तरी ती हद्द आहे म्हसवड नगरपालिकेची त्यामुळे येथे धुळदेव ग्रामपंचायत शुद्ध कोणतेही उपाय करू शकत नाही.
अन् नगरपालिका म्हसवड शहारापासून सुमारे 10 किलोमीटर या ठिकाणाकडे कधी उपाय करणार?
अन् रस्ते बांधकाम विभाग सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील या भागात कधी लक्ष वेधणार ?
या सर्व कारणांमुळं याठिकाणी कोणतीही व्यवस्था होत नाही. कोणताही गती रोधक या जागेच्या आस पास बनवलेला नाही. कोणतेही स्टड या ठिकाणी लावलेले नाहीत. उपाय म्हणून आहे ते फक्त 5xy चे एक बोर्ड त्याचा कितपत फायदा होतोय हे स्थानिकांशी चर्चा केल्यावर समजते.
यात दरदिवशी अपघात होत आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनाचे नुकसान होऊन कित्येकजण जखमी झाले आहे. अनेकांचे उपचारादरम्यान मृत्यू सुद्धा याच रस्त्यावरील अपघातात सदर फोटो मध्ये दर्शविलेली स्विफ्ट डिझायर कार आज अपघात ग्रस्त झाली संपूर्ण कार चकणाचूर झालेली आहे. गाडीमधील प्रवासी जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून कोणती जीवित हानी झाली नाही. पण प्रशासन या रस्त्याची दुरुस्ती कधी करणार याबाबत सर्व ग्रामस्थ तसेच वाहन चालक विचारणा करत आहेत. मग नक्की किती नुकसान झाल्यावर किंवा किती जीव गेल्यावर इथे दुरुस्ती होणार आहे हा सवाल निर्माण होतो. संबंधित विभागाने तत्काळ याठिकाणी राहिलेले काम पूर्ण करावे तोवर इथे एक तात्पुरते गतिरोधक बसवावे.
इंजि. महादेव शिंगाडे सर
संस्थापक - श्रीनाथ उद्योग समूह
पत्रकार - ऑल इंडिया मिडिया असोसिएशन

43
5648 views