logo

*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार – ॲड. मोहतेशम रज़ा*

*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार – ॲड. मोहतेशम रज़ा*

* *ग्रामीण प्रतिनिधी*
* *मेराज पठाण:*

लोणार तालुका काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने 10 जुलै 2025 रोजी हॉटेल अथर्व येथे भव्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्हा अल्पसंख्याक सेलचे नवनियुक्त अध्यक्ष ॲड. मोहतेशम रज़ा यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतिलालजी गुगल्या होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष डॉ. इसरार जमदार, काँग्रेस नेते प्रकाश धुमाळ, माजी तालुकाध्यक्ष राजेश मापारी, ज्येष्ठ नेते केशवराव फुके, माजी सभापती ज्ञानेश्वर चिभडे, प्राध्यापक गजानन खरात, तालुकाध्यक्ष अश्रू फुके, शहर काँग्रेस अध्यक्ष शेख समद शेख अहमद, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, काँग्रेसचे मा. सरचिटणीस साहेबराव पाटोळे, महिला तालुकाध्यक्ष सौ. ज्योती राठोड व इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मो.तौफिक हाजी अब्दुल लतिफ कुरेशी व शहराध्यक्ष वसीम खान यांनी केले होते. बैठकीत सेवादलाचे प्रदेश नेते प्रकाश भाऊ धुमाळ, डॉ. इसरार जमदार, जाकिर मेमन मा.नगर सेवक, अश्रू फुके आदींनी मनोगते व्यक्त केली.

या प्रसंगी ॲड. मोहतेशम रज़ा यांचा सत्कार करण्यात आला. मनोगतात त्यांनी सांगितले की, “काँग्रेसच्या सर्वधर्म समभावाच्या विचारसरणीचा प्रचार व प्रसार करणे हीच आपली प्राथमिक जबाबदारी आहे. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक समस्यांचे समाधान करण्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच कार्यकर्त्यांना संघटनेत सामावून घेत, संघटना बळकट केली जाईल.”

कार्यक्रमात शांतिलाल गुगल्या यांनी रज़ा यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व अल्पसंख्याक समाजासमोरील समस्या मांडल्या. तालुकाध्यक्ष मो.तौफिक हाजी अब्दुल लतिफ कुरेशी यांच्या कार्याची विशेष दखल घेतली गेली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक तौफिक कुरेशी यांनी, सूत्रसंचालन प्रा. गजानन खरात यांनी तर आभार प्रदर्शन शेख समद शेख अहमद यांनी केले.

या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये
भूषण मापारी, राजेश मापारी, अनिकेत मापारी, शेख करामत शेख गुलाब, नितीन शिंदे, सौ प्रदीप डवळे, विकास मोरे, संतोष मापारी, रमजान परसुवाले, पंढरी चाटे, दौलतराव मानकर, अजीम चौधरी, हाजी अबुशमा, फायज पठाण, शेख सरोज, शेख अमजद, शेख अकबर, शेख अफसार, तौसीफ कुरेशी, मोहम्मद अकीब कुरेशी (मा. युवक काँग्रेस शहराध्यक्ष), व NSUI विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आदींचा समावेश होता.

19
2008 views