logo

"भारतीय संविधान " ची जीनिव पुर्वक छेडछाड

*दहावीच्या पुस्तकात संविधानाच्या प्रास्ताविकेत जाणीवपूर्वक अनेक चुका....*

पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये धर्मनिरपेक्ष शब्दा ऐवजी पंथनिरपेक्ष छापले आहे.......
श्रद्धेच्या ऐवजी धर्म वापरण्यात आला आहे..
26 नोव्हेंबर 1949 या तारखे पुढे अनावश्यक (मीती, मार्गशीर्ष, शुक्ला सप्तमी, संवत दो हजार छह विक्रमी) असा उल्लेख केला असून, स्वतः प्रत अर्पण ऐवजी आत्मार्पित छापले असल्याची तक्रार बहुजन समाज पक्षातर्फे करण्यात आली......

संविधानाच्या प्रास्ताविकेत चुका करणाऱ्या लेखक व प्रकाशन समितीवर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यातील चुका विना विलंब दुरुस्त करूनच पुस्तक विद्यार्थ्यांना वितरित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.......

भारतीय संविधान कलम 51 क याच पाठ्यपुस्तकात प्रथम पानावर (आतील भागात) संविधानाच्या भाग चार क मधील मूलभूत कर्तव्य छापण्यात आली आहेत...
यात सुद्धा अनेक चुका आहेत......
नेहमीच वापरत असलेला समता ऐवजी समरसता हा शब्द जाणून बुजून वापरला गेला आहे........
ही मूलभूत कर्तव्य तीन जानेवारी 1977 रोजी 42 व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आली आहेत......
तसेच एक एप्रिल 2010 रोजी 86 वी केलेली घटना दुरुस्तीचा यात समावेश केला आहे...
परंतु मूळ संविधानातील दुरुस्तीतच त्रुटी आहे......

2014 नंतर भारतीय संविधान प्रकाशित करण्यात आलेले नाही.....
जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी 2014 सालाच्या ठिकाणी 2024 लिहून फक्त कव्हर बदलून तीच प्रत प्रकाशित करण्यात आली......
कारण त्यात दुरुस्त्या 14 पर्यंतच्याच आहेत.....
यावरून ही बनवाबनवी लक्षात येते......

विशेष म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते 14 वर्षा दरम्यानच्या आपत्याच्या शिक्षणाची जबाबदारी ही पालकांवर टाकण्यात आली आहे..... खरे तर ही जबाबदारी शासनाची आहे..... जी भारतीय संविधान लागू झाल्याच्या 60 वर्षानंतरही पुरेपूर स्वीकारली नाही, असे या प्रकारावरून संकेत मिळत आहेत.......

सौजन्याने... वृत्तरत्न सम्राट...
गुरुवार दिनांक... 26 जून 2025.

धन्यवाद.....🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

6
292 views