logo

सातारा : १० जणांची पर्यटकांना दमदाटी, ५४ हजारांचा ऐवजावर डल्ला

फलटण : धुमाळवाडी ता. फलटण येथील निसर्गरम्य धबधब्याजवळ मंगळवार दि. ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात ५ जणांनी व इतर झाडांमध्ये लपलेल्या ५ जणांनी अशा एकूण १० जणांनी दमदाटी करून ५४ हजार ५९० रुपये किमतीचा व दुसऱ्या अनोळखी पर्यटकाकडील मनी मंगळसूत्र व चांदीच्या अंगठ्या असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात राहुल मंजरतकर (वय ४६ रा. फलटण) यांनी तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक अधिक तपास करीत आहेत.

15
354 views