बुधवार ठरला आंदोलन वार..
सातारा जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांसाठी विविध विभागांच्या कार्माचारांची सरकारविरोधात आंदोलने झाली. या आंदोलनामधून आपला आक्रोश या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी , अंगणवाडी शिक्षिका सेविकांचा मोर्चा, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेची निदर्शने, त्या सोबतच वीज कर्मचार्यांची निदर्शने अशा विविध संघटना सरकारच्या धोरण विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत होत्या.
केंद्र सरकारची कामगार संहिता हि कामगारांचा आवाज दाबत असून कंत्राटी पध्दतीला तीव्र विरोध करण्यात आला.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.
संपूर्ण देशात हा संप पुकारण्यात आलेला होता . परंतु त्याचा फारसा परिणाम सातारा जिल्ह्यात दिसला नसला तरी कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने बुधवार आंदोलन वार ठरला.