logo

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS मधून काढलेले हे सूर्याचे फोटो बघा.... प्रकाशमान पांढऱ्या LED दिव्या प्रमाणे दिसत आहे.

*मेराज पठाण*
(लोणार तालुका प्रतिनिधि)
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS मधून काढलेले हे सूर्याचे फोटो बघा.

ह्यात सूर्य प्रकाशमान पांढऱ्या LED दिव्या प्रमाणे दिसत आहे.

विशेष गोष्ट म्हणजे सूर्य दिसत असून सुद्धा आजूबाजूला अंधार आहे, याचे कारण स्पेस मध्ये पृथ्वी सारखे वातावरण नाही (हवा नाही) निर्वात पोकळी मध्ये सूर्य किरण थेट सरळ दिशेत येतात आणि जसा च्या तसा सूर्याचा खरा रंग आपल्याला केवळ स्पेस मधूनच अशा प्रकारे दिसू शकतो.

जेव्हा हे पांढऱ्या रंगाचे सूर्य किरण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा ते सर्वात जास्त प्रमाणात निळा रंग विखुरतात ज्यामुळे दिवसाचे आकाश निळ्या रंगाचे दिसते.

सूर्योदय सूर्यास्त वेळी वातावरण आणि क्षितीजाच्या जवळ असणाऱ्या जमिनीवरील जाड धुलीकणांचे थर यांच्यातून सूर्य प्रकाश येताना त्यातली केवळ लाल रंग छटा पार होतात आणि म्हणून सूर्य उगवताना / मावळताना लालसर दिसतो

प्रत्यक्षात सूर्याचा रंग हा पांढरा असून तो इंद्रधनुष्याच्या सप्त रंगाचा एकत्रित बनला आहे.

इंद्रधनुष्य हे पाण्याच्या थेंबातुन सूर्य प्रकाश अपवर्तन Refraction होऊन बनते यावर सविस्तर माहिती वेगळ्या पोस्ट मध्ये दिली आहे कमेंट मध्ये लिंक वर जाऊन वाचा.

सूर्याचा रंग ज्या वर्णपटलात अपवर्तित होतो त्यातील हिरव्या रंगाचा भाग (वेव्हलेन्थ) सर्वात जास्त तीव्रतेची असते,
कदाचित हे एक कारण आहे की पृथ्वीवर जीवन बनले ते याच हिरव्या रंगाच्या अनुसरून वनस्पती प्रकाश संस्लेषण करू लागल्या किंवा मानवाचे डोळे सुद्धा हिरवा रंग मध्य मानून इतर रंगांचा सूक्ष्म फरक समजू शकतात. यावर वेगळी पोस्ट नंतर करेन.

लक्षात ठेवायचा मुद्दा असा की सूर्य हा पांढऱ्या रंगाचा मध्यम आकाराचा तारा आहे आणि सूर्यासारखे लाखो तारे आपल्याच आकाशगंगेत आहेत.

ताऱ्यांचे इतर रंग सुद्धा असतात यावर सविस्तर माहिती नंतर वेगळ्या पोस्ट मधून बघू.

100
3125 views