logo

ऐतिहासिक नाणी म्हणजे कला आणि संस्कृती,*

*ऐतिहासिक नाणी म्हणजे कला आणि संस्कृती,*
*नाण्यांनीच दिली इतिहासाला, मोजमापापलीकडची श्रीमंती...*



व्यापार आणि कलेसोबत, जन्मास आला अशोकस्तंभ,
मौर्यकाळात असत्याला, मिळाला बुद्धवादी प्रतिबंध.

कुशाणांनी केला, सुवर्ण नाणींचा आविष्कार,
व्यवहाराचा व्यवहाराला, दिला त्यांनी पुरस्कार.

सातवाहनांनी केला, शालिवाहन शके आरंभ,
साहित्याच्या नाणी झाल्या, याचकाळी बहुरंग.

सोने की चिडिया देश, म्हणे काळ गुप्त,
चालायची नाणी तेंव्हा, सोन्याचीच फक्त.

रुपयाचा जन्मदाता, बादशाह शेरशाह सूरी,
रुपया झाला सर्वश्रेष्ठ, ज्याच्यात्याच्या घरी.

मुघलांच्या नाण्यांनी, दिल्या कित्येक वास्तुकला,
त्यामुळेच भारतवर्षाचा, उदरनिर्वाह चालायला.

सुवर्णकाळ आला, आली सुखाची हिरवाई,
जगभरात गाजली, शिवबांची नाणी शिवराई.

स्वराज्यात चालावी नाणी, इंग्रजांची होती आशा,
स्वाभिमानी चलनाने, अजरामर झाली मराठीभाषा.

हिजरी सनाच्या नाण्यांनी, जागविला देशाभिमान,
इंग्रजांविरुद्धच्या लढाईत, शहीद झाले टिपू सुलतान.

१९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला,
१९५० पर्यंत, ब्रिटिश नाणी होती व्यवहाराला.

बहुजनोद्धारक मग, संविधान लिहिता झाला,
बाभीमानेच भारताचा, सर्वांगीण उद्धार केला.

असो परिस्थिती कशीही, गावी लागते समृद्धीची गाणी,
इतिहास कळविण्या जगाला, खर्चावी लागते बुद्धीची नाणी...

*- इतिहास संशोधक, नाणेतज्ज्ञ शेख दिलावर*
*( अंत्री खेडेकर, चिखली, बुलढाणा )*
*संपर्क : ९३२२३९३२१९*

51
3736 views