सातारा : या योजनांना वीज बील माफी देऊन पुन्हा अनुदान सुरू करावे
कराड उत्तर : राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या सहकारी तत्त्वावरील पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत. सरकारने दि. १ एप्रिल २०२५ पासून या योजनांना दिले जाणारे ७५ टक्के अनुदान थांबविल्याने ग्रामीण भागातील बागायती शेती अडचणीत आली. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घेऊन या सहकारी पाणीपुरवठा योजनांना विज बिल माफी देऊन पुन्हा अनुदान सुरू करावे अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांनी मुंबई येथे विधानसभेत केली. विधानसभा पावसाळी अधिवेशन मुंबई सुरू असून पुरवणी मागण्यावर चर्चा सुरू असताना मागणी करण्यात आली आहे.