
ऊध्या दिनांक 9 जुलै 2025 रोजी,
सिंटु म्हणजेच लाला बावटा संघटनेच्या वतीने, वडवणी कार्यालया समोर आंदोलन व निदर्शने
उद्याच्या भारत बंद आंदोलनातील प्रमुख मागण्या
१) कामगार विरोधी मालकधार्जण्या 4 चार श्रमसंहीता रद्द करा
2) सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण थांबवा.
3) बांधकाम कामगारांसाठी जाहिर केलेले 5000 हाजार रू दिवाळी बोनस तात्काळ द्या.
4) गेल्या शैक्षणिक वर्षातील कामगारांना पाल्यांची शिष्यवृत्तीचे पैसे तात्काळ द्या
5.) बांधकाम कामगार व शेतकरी शेतमजूरांना तात्काळ राशन कार्ड द्या .
6) बांधकाम कामगारांच्या योजनाला सेवा हमी कायदा लागू करा म्हणजे बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ तीन महिन्यांच्या आत मिळेल.
6.) राशन कार्ड वरील नावे लवकर दुरुस्त करून द्या
7.) बांधकाम कामगारांसाठी पुर्वी सारखी साहित्य खरेदी योजना सुरू करा .
8) बांधकाम कामगारांना भांडी नको पैसे द्या.
9.) शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या.
10.) शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करा.
11) जनतेच्या लोकशाही अधिकारांवर गदा आणणारे महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक मागे घ्या.
11).आशा व गटप्रवर्तकाचे सहा महिन्यांचे थकीत मानधन द्या.
12) शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनात केलेली एक 1000 रु वाढ तात्काळ द्या.
13.) कामरांना किमान वेतन 26000 रू द्या
14.) निर्धारांना वेळेवर पेन्शनचे पैसे द्या.
15.) घरकुल लाभार्थीच्या खात्यावर घरकुलर हाफत्याचे पैसे तात्काळ द्या.
16) शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज द्या
17) गायरानात व इतर जागेत बांधलेली घरे व वीस वर्षे पासून कसत असलेली गायरान जमिन शेतमजूराच्या नावे करा.
18.) घरकुल योजनेचे अनुदान साडेचार लाख करा .
19) ऊसतोड मजुरांच्या मुलाना ऊसतोड कामगार महामंडळाकडू शिष्यवृत्ती योजना सुरू करा वरील सर्व मागण्याना घेऊन उद्या निदर्शने करण्यात येणार आहेत तरी सर्व बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.