logo

मालेगाव महापालिका विलंबित जन्म नोंद / प्रमाणपत्र घोटाळा, FIR क्र. 103, दि.10/6/2025. FIR मध्ये 1044 अर्जदार/ आदेशांचा उल्लेख परंतु त्यांच्याविरुद्ध पोलीसांची कारवाई नाही -डॉ. किरीट सोमैया

मालेगांव :-मालेगाव महापालिकेने त्यांच्या आरोग्य विभाग/ निबंधक विभाग यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्या संबंधी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे,महापालिकेने आता यासंदर्भात 10/06/2025 रोजी किल्ला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलामहापालिका उपनिबंधक अब्दुल तवाब अब्दुल रजाक व गजाला परवीन यांची पोलीसांनी यापूर्वीच मालेगाव येथील विलंबित जन्म नोंद/ प्रमाणपत्र घोटाळ्या संदर्भात अटक केली आहे.मालेगाव महापालिकेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली परंतु ज्या 1044 लोकांनी महापालिकेची फसवणूक केली, जन्म नोंदी/प्रमाणपत्र मिळवले आहे त्याच्या विरोधात तक्रार, कारवाई केली नाही.वास्तविकरित्या 974 (1044 मधील 70 duplicate आहे) अर्जदार लाभार्थी यांनी तहसीलदार (कार्यकारी दंडाधिकारी) यांचे बनावटी, बोगस आदेश महापालिका कार्यालयात दिले.
यांनी जे बोगस, बनावटी फसवणूक करणारे अर्ज दिले होते त्याचे विश्लेषण आम्ही आधीच आपणास पाठविले आहे. फसवणूक कशी करण्यात आली याची माहिती पुढीलप्रमाणे :
जन्म प्रमाणपत्र घोटाळा-मालेगांव 202 लोकांनी अर्जासोबत पुरावा म्हणून फक्त आधार कार्ड दिले आहे (रेशनकार्ड, आयकार्डचा काही अर्थ नाही). आधार कार्डवरील जन्मतारीख एक आणि ज्या जन्म तारखेच्या नोंदीसाठी अर्ज केला आहे ती जन्मतारीख वेगळी आहे. असे असून देखील तहसीलदारांनी खोट्या फसव्या जन्मतारखेच्या नोंदीचा आदेश दिला.143 अर्जदारांनी अर्जासोबत काहीही कागदपत्रे किंवा पुरावे नाही. 90 अर्जदारांनी अर्जासोबत दिलेल्या आधार कार्डवर जन्मतारीख 01/01 लिहिली आहे म्हणजे त्यांचा जन्म 1 जानेवारीला झाला असे सांगितले आहे.
मालेगाव पोलीसांनी अजून पर्यंत एकाही अर्जदार/ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला नाही, कारवाई केली नाही ही गंभीर बाब आहे.मालेगाव महापालिका, पोलीसांनी ताबडतोब कारवाई करावी ही विनंती. धन्यवाद !

0
199 views