logo

मालेगाव येथील 1044 बोगस अर्जदारांविरोधात कारवाई करा ! -डॉ. किरीट सोमैया

मालेगांव :-मालेगाव येथील 1044 अर्जदार ज्यांनी "आमचा जन्म मालेगाव येथे झाला आहे" असे खोटे शपथपत्र देऊन, बनावटी कागदपत्रांद्वारे उशिराच्या जन्म नोंदी घेतल्या/ जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले. मालेगाव महापालिकेच्या तक्रारीवरून या अर्जदारां विरुद्ध मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या 1044 लोकांनी महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली आहे तसेच तहसीलदार (कार्यकारी दंडाधिकारी) यांचे बनावटी आदेश महापालिकेला देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवले आहे. या जन्म प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांना भारतीय नागरिकत्व व पासपोर्ट प्राप्त होऊ शकते. या 1044 अर्जदारांपैकी (1044 मधील 70 duplicate आहे) 199 अर्जदार असे आहेत ज्यांनी अर्जासोबत पुरावा म्हणून फक्त आधारकार्ड दिले आहे. त्यांच्या आधार कार्डवरील जन्मतारीख एक आणि ज्या जन्म तारखेच्या नोंदीसाठी अर्ज केला आहे ती जन्मतारीख दुसरीच आहे. असे असून देखील तहसीलदारांनी खोट्या, फसव्या जन्मतारखेच्या नोंदीचे आदेश दिले. 143 अर्जदारांनी अर्जासोबत काहीही कागदपत्रे किंवा पुरावे दिलेले नाही. 90 अर्जदारांनी अर्जासोबत दिलेल्या आधार कार्डवर जन्मतारीख 01/01 लिहिली आहे म्हणजे त्यांचा जन्म । जानेवारीला झाला असे त्यांनी सांगितले आहे. तहसीलदारांनी दिलेल्या खोट्या आदेशांच्या आधारावर या बोगस अर्जदारांनी महापालिकेकडून जन्म प्रमाणपत्र मिळवले.या अर्जदारांविरोधात लवकर कारवाई करण्याची मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे.

2
245 views