गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस बाळगणारा आरोपी जेरबंद;
वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीतील रामनगर व गोकुळनगर परीसरातील पाहन जाळपोळ, तोडफोडीच्या घटना व गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी या वर्षीच्या सुरुवातीलाच मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार व पोलीस उप-आयुक्त श्री संभाजी कदम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काईगडे यांना आवश्यक त्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार येथील गुन्हेगारीचर नियंत्रण आणण्यासाठी महत्वाच्या गुन्हेगारांना ज्यांची धोकादायक व्यक्ती म्हणून समाजात ओळख झालेली आहे, व ज्यांच्या धोकादायक हालचालींमुळे समाजजीवन वारंवार विस्कळीत होत आहे, अशांना स्थानबध्द करण्यासोबतच प्रभाची फुट पेट्रालिग आणि अवैध शस्त्रांचा वापर करुन गुन्हे करणान्या इसमांचा शोध घेणे अशा सर्व पातळीचर काम चालू होते.
पुणे शहरामध्ये दिनांक ०४/०७/२०२५ रोजी अति महत्वाच्या संरक्षित व्यक्तीचा दौरा होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या प्रभावी उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत होता. त्याअनुशंगाने वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोउपनि संजय नरळे व त्यांचे संपूर्ण तपास पथक हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या इसमांच्या मागावर होते. दिनांक ०२/०७/२०२५ रोजी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार गणेश शिंदे यांना बातमी मिळाली की, "एक इसम हा डी.पी रोड कर्वेनगर पुणे येथे रोडवर थांबलेला असून त्याच्याकडे पिस्टल आहे, त्याने अंगात पिवळ्या रंगाचा फुल बाह्यांचा टिशर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे." अशी बातमी मिळाल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाणेकडील पोलीस उप-निरीक्षक श्री संजय नरळे यांनी पोलीस स्टेशनकडील स्टाफसह सदर ठिकाणी जावून बातमीतील वर्णनाचे इसमाचा शोध घेतला असता एक इसम संशयीतरित्या हालचाल करीत असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेवून त्याला त्याचे नाच पत्ता विचारता त्यानी त्याचे नाच सागर अनिल मुंडे, वय २१ वर्षे, रा. पांढरे यांचे घर, गल्ली नं. २७. शिवशक्ती नगर, सुतारदरा, कोथरुड, पुणे असे असल्याचे सांगितलेनंतर त्याची अंगड़ाडती घेता इसम नामे सागर अनिल मुंडे याचे कब्जात ४०,०००/- रु.कि. चे एक सिल्वर रंगाच्या धातूचे देशी बनावटीचे पिस्टल व ५००/-रु.कि.चे एक जिवंत काडतुस मिळुन आले ते पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे यांनी जप्त करून ताब्यात घेतले.
नमुद इसम नामे सागर अनिल मुंडे, वय २१ वर्षे, रा. पांढरे यांचे घर, गल्ली नं, २७, शिवशक्ती नगर, सुतारदरा, कोथरुड, पुणे याचेविरुद्ध अग्नीशस्व बाळगले बाबत पोलीस अंमलदार गणेश शिदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर २८६/२०२५, आर्म अॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिकलम ३७(१) सह १३५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून नमुद आरोपीस अटक करुन एक दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे. आरोपींनी सदरचे अग्नीशस्व कोवुन आणले व कशासाठी जवळ बाळगले याबाबत पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, वारजे माळवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर हे करीत आहेत, अशाप्रकारे वारजे माळवाडी पोलीस ठाणेच्या हद्दीत अवैध पिस्टल जप्तीची ही यावर्षीची एकुण ०४ थी कारवाई असून यावर्षी ०७ कोयते व तत्सम यारदार शस्व जप्तीच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कारवाई ही मा.श्री संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त, परिमंडल ३ पुणे शहर, मा.श्री. भाऊसाहेब पटारे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग यांचे सूचनेनुसार, श्री. विश्वजीत काड़ेंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे, श्री. प्रकाश धेंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पोलीस ठाणे, श्री. निलेश बडाख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार गणेश शिंदे, बालाजी काटे, योगेश वाघ, सागर कुंभार, शरद पोळ, निखील तांगडे, अमित शेलार, अमित जाधव यांनी केलेली आहे.