ग्रामपंचायत प्रशासन जेवळी यांनी ३ लक्ष रुपये खर्च करून आपल्या गावातील स्मृती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री जगदीश
धाराशिव जिल्हा मधील जेवळी ग्रामपंचायत मधील भ्रष्टचार खलील प्रमाणेग्रामपंचायत प्रशासन जेवळी यांनी ३ लक्ष रुपये खर्च करून आपल्या गावातील स्मृती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री जगदीश बेडगे यांच्या घराजवळील चौक, श्री रमेश हावळे यांच्या घराजवळील चौक व उमरगा जनता बँक जवळील चौक या ठिकाणी तीन लाख रुपये खर्च करून सी.सी. टी.व्ही. कॅमेरा बसवण्यात आले होते परंतु आज रोजी या सर्व चौकातील एकही सीसीटीव्ही कॅमेरा चालू नाही अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तेथे नाहीत याकडे ग्रामपंचायत प्रशासन यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे व हे खरेदी केलेले सीसीटीव्ही कॅमेरे निकृष्ट दर्जाचे आहेत त्यामुळे हे असे बंद अवस्थेत आहेत फक्त शासनाच्या पैशातून काम दाखवणे व त्यातून आर्थिक लाभ मिळवणे हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेवून गावच्या पैशाची अशी उधळपट्टी संबंधित ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून होत आहे मी बोलल्यानंतर किंवा मी त्यांची चूक दाखवल्यानंतर त्यांना वाईट वाटत आहे परंतु हा पैसा त्यांचा स्वतःचा नाही हा पैसा गावचा आहे त्यामुळे त्यांच्याकडून चूक झाल्यानंतर किंवा चूक करत असताना मी आवाज उठवणारच जरी त्यांना वाईट वाटलं तरी मला काही फरक पडणार नाही कारण हा पैसा गावचा आहे कोणत्याही एका व्यक्तीचा नाही.