
आषाढी एकादशीनिमित्त दत्तात्रय काळे यांचा विशेष संदेश
नवी मुंबई: महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा दिवस असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध संघटनांमध्ये सक्रिय असलेले श्री. दत्तात्रय काळे यांनी महाराष्ट्रातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. श्री. काळे हे दर्शन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे चिटणीस, भारतीय मराठा महासंघाचे घणसोली विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेनेचे चिटणीस आणि आइमा मीडिया फाउंडेशन (ऑल इंडिया मीडिया असोसिएशन) मध्ये कार्यरत आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात श्री. काळे यांनी म्हटले आहे की, "आषाढी एकादशी हा भक्ती आणि श्रद्धेचा दिवस आहे. या दिवशी विठ्ठल माऊलीच्या चरणी लीन होऊन आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी." त्यांनी पुढे सांगितले, "पंढरपूरची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून, ती महाराष्ट्राच्या एकजुटीचे आणि सामाजिक समतेचे प्रतीक आहे."
या पावन पर्वावर विठुरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद आणि भरभराट येवो, अशी सदिच्छा श्री. काळे यांनी व्यक्त केली.
बातमीसाठी संपर्क:
दत्तात्रय तुकाराम काळे
(सामाजिक मीडिया कार्यकर्ता, एआयएमए मीडिया फाउंडेशन प्रतिनिधी)
मोबाईल: ८०८००७६२६२