logo

वारी पंढरीची पुस्तकाचे वाखातीत पकासन हरिनाम गजरात

वारी पंढरीची पुस्तकाचे वाखातीत प्रकाशन हरिनाम गजरात

वाखरी ( रवि कदम) : येथील वाखरी येथे दत्तात्रय पांडुरंग गायकवाड महाराज लिखित "वारी पंढरीची" या पुस्तकाचे प्रकाशन देहू देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे हस्ते हरिनाम गजरात झाले.
या प्रसंगी श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, मा. विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे, लेखक दत्तात्रय पांडुरंग गायकवाड, सुरेखा दत्तात्रय गायकवाड, हभप बद्रीनाथ महाराज सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
वारी पंढरीची या पुस्तकामध्ये वारी विषयी माहिती देताना! वारी म्हणजे काय? वारीचा इतिहास, वारकरी, वारीची परंपरा, दैवत श्री विठ्ठल,पंढरीचे महात्म्य, तसेच माता ऋख्मिणी वगैरे माहिती समाविष्ट आहे. साईराजे प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
या प्रसंगी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे म्हणाले की " वारी पंढरीची" हे पुस्तक वारकऱ्यांना प्रेरणादायी ठरेल तसेच वारी विषयी मानसीकता समाजात अधिक द्रृढ होईल असे वाटत असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त केलं.

6
548 views