logo

लाडकी बहीण योजना जुन महिन्याचा हप्ता कढी मिळणार ?

(रवि.कदम पुणे ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत योजनेतील लाभार्थी महिला वाट पाहत होत्या निधीची कमतरता असल्यामुळे जून चा हप्ता देण्यास काहीसा विलंब झाला. अखेर पात्र महिलांना जून महिन्याचे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती घटकासाठी असलेल 410 कोटी ३० लाख रुपये इतका निधी वळविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती या संबंधीच्या शासन निर्णय नुकताच काढण्यात आला होता. यानंतर आता जूनच्या अनुदानाबाबत महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे माहिती दिली आहे. जून महिन्याचा सामान्य निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची मंत्री आदित्य तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारा सांगितली मंत्री आदित्य तटकरे म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सामान्य निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आज पासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांचा आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून सन्मान निधी जमा होणार आहे

56
2415 views