Eknath Shinde Jai Gujarat slogan | 'डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप बाहेर आले!' शिंदेंच्या 'जय गुजरात' घोषणेवर राऊतांचं टीका
Eknath Shinde Jai Gujarat slogan | 'डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप बाहेर आले!' शिंदेंच्या 'जय गुजरात' घोषणेवर राऊतांचं टीकास्त्रठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील (Amit Shah Pune visit) कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' अशी घोषणा दिली. यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी X वर पोस्ट करत, 'अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले!' असे म्हटले आहे.पुण्यात या महाशयांनी अमित शहा यांच्यासमोर 'जय गुजरात' ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या, हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?' अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी या पोस्टसोबत शिंदेंच्या भाषणाचा व्हिडिओही शेअर केला आहे.अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले!पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली!काय करायचे?ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजाराहजार माराव्या आणि एक मोजाव्याहा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?