
Pune News : वनविभागाची मोठी कारवाई; ५०० किलो मोरपिसांचा साठा जप्त
मोरपिसे बाहेरच्या राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती:
Pune News : वनविभागाची मोठी कारवाई; ५०० किलो मोरपिसांचा साठा जप्त
मोरपिसे बाहेरच्या राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती: ११ जण ताब्यातपुणे : शहरात तब्बल ४०० ते ५०० किलो मोरपिसांचा साठा जप्त करण्यात शुक्रवारी (दि.४) वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. शहरातील सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात सापळा रचून वनविभागाने कारवाई करत ११ जणांना ताब्यात घेतले. हा साठा ज्या ठिकाणी ठेवला होता तो पाहून वनविभागाचे कर्मचारीही आश्चर्यचकीत झाले.आजवरची ही पुणे वनविभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. ही मोरपीसे बाहेरच्या राज्यातून तस्करी करीत पुण्यात आली असल्याचा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
शहरातील सोमवार पेठेतील नरपतगीरी चौक भागात शुक्रवारी हजारो किलो मोरपिसांची अवैधरित्या साठवणूक करूण विक्री करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती वनविभागातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार वनविभागाने सापळा रचून ११ जणांना ताब्यात घेतले.त्यांची चौकशी केली असता मोराची पिसे विक्री करण्यासाठी आणली असल्याचे सांगितले. मात्र, आरोपींची आणखी कसून चौकशी केल्यावर श्री.संत गाडगेबाबा धर्मशाळा येथील वसाहतीमध्ये आमचे इतर सहकाऱ्यांनी मोराची पिसे साठवली असल्याची माहिती दिली.