logo

Pune Crime: ना डिलिव्हरी बॉय, ना लैंगिक छळ; पुण्यात तसलं काही घडलंच नाही, सेल्फीही संमतीनेच, मोठा खुलासा Pune Kondhwa S

Pune Crime: ना डिलिव्हरी बॉय, ना लैंगिक छळ; पुण्यात तसलं काही घडलंच नाही, सेल्फीही संमतीनेच, मोठा खुलासा
Pune Kondhwa Society Woman Assault Case: पुण्याच्या कोंढवा परिसरात एका 25 वर्षांच्या तरुणीवर डिलिव्हरी बॉयकडून लैंगिक छळ झाल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, तसं कधी घडलंच नसल्याचं आता तपासात समोर आलं आहे.आदित्य भवार, पुणे: काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोंढवा परिसरात एका तरुणीवर डिलिव्हरी बॉयने घरात घुसून लैंगिक छळ केल्याची तक्रार समोर आली होती. मात्र, आता या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. असला काही प्रकार कधी घडलाच नव्हता आणि ही संपूर्ण घटना तरुणीच्या मानसिक अस्थैर्यामुळे उभी राहिल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात वेगळंच वळण आलं आहे.बुधवारी (4 जुलै) ही घटना मध्यरात्री 1:30 च्या सुमारास घडल्याचं सांगितलं जात होतं. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रेसिंग आणि परिसरातील चौकशी यावरून सत्य समोर आलं. या प्रकाराची माहिती सकाळी 9 वाजता पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर संबंधित तरुणीस सीसीटीव्ही क्लिप दाखवण्यात आली. मात्र, तरुणीने आरोपीला ओळखण्यास नकार दिला.,

25
687 views