तुम्ही कॉल करा ; मी बैल पाठवतो, अभिनेता सोनू सूद
लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध दाम्पत्य शेतात नांगरणी करताना दिसत होते. यात पती नांगर ओढत होता तर पत्नी नांगर सांभाळत होती. हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. या दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून शेती नांगरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते स्वतःच हे काम करत असल्याचे समोर आले होते.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूद या शेतकरी दाम्पत्याच्या मदतीसाठी पुढे सरसावला. त्याने थेट प्रतिक्रिया देत लिहिले की तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासनही तात्काळ सक्रिय झाले आणि मदतीसाठी या वृद्ध दाम्पत्याकडे पोहोचले.
दरम्यान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी देखील या वृद्ध दाम्पत्याला फोन करून तुमचे कर्ज मी फेडतो, अशी ग्वाही देत मदतीचा हात पुढे केला आहे.