logo

धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चे म्हसदी शाखेचे शाखाधिकारी नानासाहेब / नामदेव वंजी बच्छाव हे सेवा निवृत्त झाले

आणि अखेर तो आजचा काळा दिवस उगवला 30/06/2025.
मी कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव आज माझी प्रदीर्घ बँकिंग सेवेतून ब्रँच मॅनेजर म्हणून निवृत्ती होत आहे. शेवटी वयाचे 58 पूर्ण केले की सर्वांनाच निवृत्ती ही घ्यावीच लागते. काळा दिवस ह्या करिता म्हटले की आपल्या सर्व प्रेमळ मित्रांना सोडून जावं लागतंय .
बघता बघता नोकरी ची 35/36 वर्ष उलटून गेली. भूतकाळात मागे बघताना आठवत की मी 1985 ते 1988 ला BA करून आलो. 15 मे 1989 रोजी बापाने लग्न लावून दिले. नोकरी नव्हती म्हणून मी रस्त्यावर माती टाकली,शेतात कामाला जाऊ लागलो, मी सुरुवाती पासूनच स्वाभिमानी असल्या मुळे मी काम करत होतो. मग माझ्या संसाराच्या वेली वर एक कळी उमलली. पहिली मुलगी जन्माला आली येताना माझ्या साठी नोकरी ही घेऊन आली. त्या नंतर अजून तीन मुली झाल्या. व्यसन कोणत ही नसल्या मुळे मी मुलींचे उच्च शिक्षण करू शकलो. कोणत्याच मुलीने नाव बदनाम केलं नाही याचा मला सार्थ अभिमान आहे.
मी मुलींना म्हटले की मला मुलगा नाही म्हणून मी नाराज दिसतो का ? नाही पप्पा.मग मला नाव कमवून दाखवा.मला आर्थिक तोशीस किती ही लागू द्या चालेल पण कोणी कॅरेक्टर वर नाव ठेवेल अस वागू नका. मी माझ्या मुलीना धन्यवाद देतो की माझं नाव शाबूत ठेवलं.तसेच माझ्या मुलींनी नाव कमवून दाखवले. धन्यवाद मुलिनो सुखी रहा आनंदी रहा.
आज बघता बघता मला तीन नातू एक नात आहे. नी मी बाबा झालो.
मी कराटे स्पोर्ट्स मध्ये नाव कमावलं स्टेट नॅशनल खेळलो .धनश्री मुलीने राष्ट्रीय स्तरावर व अंतर राष्ट्रीय स्तरावर कराटे मध्ये मेडल जिंकून दिले. मुलावर जो खर्च केला असता त्याने ही नाव कमवून दिले असते. मी मुलीवर खर्च केला तिने ही कराटे मध्ये नाव कमवून दिले. पत्नी ही सोज्वळ मिळाली. कसलाही हट्ट केला नाही, जे दिल जेव्हढे दिले तेव्हड्यात संसार करून दाखवला. कुठे फिरायला न्या,चांगल्या हॉटेलात जेवण पाहिजे असे काही ही अवास्तव मागणी नाही . सोन चांदी पाहिजेच असा हट्ट नाही ,पगार हातात द्या असे ही नाही.फिरायला नेत नाही याचा राग नाही. म्हणून आता रिटायर झाल्यावर खूप फिरविन.माझा संसार आनंदात केला म्हणून तिचे आभार मानावे तेव्हढे कमी च असो.
बँकेत ही 35/36 वर्ष इमाने इतबारे नोकरी केली. माझ्या वडिलांचं रक्त शुद्ध व ईमानदारीच होत म्हणून माझ्या ही रक्तात ईमानदारीच होती व आहे. कधीच फ्रॉड चां विचार आला नाही ग्राहकांना सेवा चांगली पुरवली कोणालाच त्रास दिला नाही कोणा कडून चहाची सुद्धा अपेक्षा केली नाही, तर पैसे खूप दूर ची गोष्ट आहे. आणि त्याचच फळ आहे चित्रपट सृष्टीत एन्ट्री व सेलिब्रिटी .नाव पैसा अजून काय पाहिजे.तसेच साठीत आल्यावर कोणाला मिळते करोड पती ची आपोर्चुनिटी . हे सर्व चांगल्या कर्माची फळ. आई वडिलांची सेवा व लॉ ऑफ एट्रॅक्शन ची साधना तसेच गुरुदत्ताची कृपा आशीर्वाद, नवनाथांची कृपा .2021 मध्ये माझ्यावर खोटी 295 कलम लावली लोकांनी बदनाम केलं मला .
पण गुरुदत्ताने दोनच महिन्यात न्याय करून दिला .ज्याने खोट केलं त्याला मनमाड ला 14 चाकी ट्रालाखाली चीप केलं. त्याच कर्म वाईट होत.कर्माची फळ इथेच भोगावी लागतात. माझं कर्म चांगलं म्हणून मला देवाने सेलिब्रिटी केलं व गुरुदत्ताच्या आशीर्वादाने करोड पती ही होईल .असो
माझ्या चित्रपटांना भर भरून प्रतिसाद द्या.मी कराटे च्या माध्यमातून समाज सेवा केली.आता मनोरंजन च्या माध्यमातून समाज सेवा करीन.
चला जड मनाने तुमचा निरोप घ्यावा लागतो. 2/4 लोक वगळता सर्व च मित्र आहेत. मी सर्व मित्रांच्या ऋणात राहू इच्छितो. ज्येष्ठ असल्यास आशीर्वाद द्या.बरोबरी चे असल्यास शुभेच्छा द्या.
माझ्या कडून काही चुकले असल्यास माफ करावे.
*माझे बँकिंग चे गुरू पराग पाटील सर रवी चव्हाण सर यांचे स्पेशल आभार व धन्यवाद.यांनी वेळोवेळी कॉम्प्युटर बाबत मार्गदर्शन केले म्हणून मी बँकेत काम करू शकलो. मला चांगले मार्गदर्शक म्हणून V P पाटील (दादा) माझे सख्खे मोठे मेव्हणे व दोन नंबर चे लहान मेव्हणे S S अहिरराव साहेब यांनी सुद्धा मला खूप मदत केली यांचे उपकार विसरू शकणार नाही. बाकी सर्व मित्रांची साथ होतीच,असेच प्रेम राहू द्या ही विनंती.*
मी सर्व मित्रांचे आभार मानतो व जड अंतःकरणाने आपला निरोप घेतो .खूप खूप धन्यवाद 🙏🌹🌹
*आपलाच
नाना कराटे,
बच्छाव नाना,
कराटे मास्टर

154
5893 views