logo

11th Admission: दोनच दिवसांत दीड लाखांवर प्रवेश; 7 जुलैपर्यंत घेता येणार प्रवेश प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 3

11th Admission: दोनच दिवसांत दीड लाखांवर प्रवेश; 7 जुलैपर्यंत घेता येणार प्रवेश
प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, पहिल्या प्रवेश फेरीअंतर्गत पुणे विभागातील 1 लाख 16 हजार 291 जागांसाठी प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार दोनच दिवसांमध्ये तब्बल 1 लाख 58 हजार 146 विद्यार्थ्यांनी कॅपद्वारे प्रवेश घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आली. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलै या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशातील पहिल्या प्रवेश फेरीसाठी राज्यातील 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांनी अर्ज केले.

1
0 views