logo

Monsoon Update: कोकणात अतिमुसळधार, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार

Monsoon Update: कोकणात अतिमुसळधार, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार.
पुणे: राज्यात केवळ कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. उर्वरित मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस काही भागात पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात गुरुवार (दि. 3) ते शनिवार (दि. 5 जुलै) दरम्यान कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील. हवामान तज्ज्ञांच्या मते, 11 जूननंतरच हवेचे दाब राज्यात अनुकूल होणार आहेत. त्यानंतरच राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Published on: aima media जण जण की आवाज
03 Jul 2025,

0
121 views