
आयटी पार्क पिंपरी-चिंचवडमध्ये नकोच! आयटीयनच्या मागणीला हिंजवडीसह इतर स्थानिक ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध
आयटी पार्कमधील समस्यांचा मुद्दा भरकटविला जात असल्याचा दावाही ग्रामपंचायतींनी केला आहे. आयटी पार्क परिसरातील समस्या सोडविण्यासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय गरजेचा असल्याची त्यांची भूमिका आहे.
आयटी पार्क पिंपरी-चिंचवडमध्ये नकोच! आयटीयनच्या मागणीला हिंजवडीसह इतर स्थानिक ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध
आयटी पार्कमधील समस्यांचा मुद्दा भरकटविला जात असल्याचा दावाही ग्रामपंचायतींनी केला आहे. आयटी पार्क परिसरातील समस्या सोडविण्यासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय गरजेचा असल्याची त्यांची भूमिका आहे.पुणे : राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील नागरी समस्या सुटत नसल्याने त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी आयटीयननी केली होती. याला काही स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पाठिंबा दिला आहे. मात्र, या मागणीला आता स्थानिक ग्रामपंचायतींनी विरोध केला आहे. याचबरोबर आयटी पार्कसाठी स्वतंत्र नगरपालिकेची मागणी त्यांनी केली आहे.हिंजवडी आयटी पार्कमध्ये खराब रस्ते, पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होणे यांसह अनेक समस्या आहेत. आयटी पार्कची जबाबदारी विविध शासकीय यंत्रणांमध्ये विभागलेली आहे. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पिंपरी-चिंचवड महापालिका, स्थानिक ग्रामपंचायती अशा विविध शासकीय यंत्रणांचा समावेश आहे. या यंत्रणांमध्ये योग्य समन्वय नसल्याने आयटी पार्कमधील नागरी समस्या सुटण्याऐवजी त्यात भर पडते. यंदा पावसाळ्यात आयटी पार्कमधील रस्त्यांवर पाणी साचून त्याचे रूपांतर ‘वॉटर पार्क’मध्ये झाले. त्यामुळे आयटी पार्कचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी आयटीयननी केली होती.
या मागणीला आयटी पार्कमधील हिंजवडी, माण या स्थानिक ग्रामपंचायतींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आयटी पार्कमधील समस्यांचा मुद्दा भरकटविला जात असल्याचा दावाही ग्रामपंचायतींनी केला आहे. आयटी पार्क परिसरातील समस्या सोडविण्यासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय गरजेचा असल्याची त्यांची भूमिका आहे. याचबरोबर आयटी पार्कमधील एमआयडीसीच्या हद्दीत नागरी सुविधांची समस्या गंभीर असून, ग्रामपंचायतींच्या हद्दीत रस्त्यांसह इतर सुविधा चांगल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.