पाच दिवसांपूर्वी महानगरप्रमुख केलं, त्यांनीच ठाकरेंना 'मामा' बनवलं; राजवाडे भाजपच्या वाटेवर Uddhav Thackeray : शिवसेना
पाच दिवसांपूर्वी महानगरप्रमुख केलं, त्यांनीच ठाकरेंना 'मामा' बनवलं; राजवाडे भाजपच्या वाटेवरUddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यासह पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्का बसला आहे. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्यानंतर आणखी एका बड्या नेत्याने शिवबंधन सोडले आहे. विशेष म्हणजे चारच दिवसांपूर्वी ठाकरेंनी ज्यांच्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली, त्या मामा राजवाडे यांनीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका दिला आहे. ते भाजपचा झेंडा खांद्यावर घेणार आहेत.