logo

गालापूर ग्रा.पं.ला आयएसओ मानांकन



एरंडोल : गालापूर ग्रामपंचायतील आयएसओ मानांकन मिळाले आहे. गालापूर ही तालुक्यातील पहिली आयएसओ ग्रामपंचायत ठरली आहे.. जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या हस्ते गालापूरचे ग्रामविकास अधिकारी रमेश पवार यांना आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे यांची उपस्थिती होती. या कामासाठी गटविकास अधिकारी, एरंडोल दादाजी जाधव आणि विस्तार अधिकारी बी. के. पारधी यांचे मार्गदर्शन लाभले.

0
0 views