logo

नाकाडोंगरी सहकारी राईस मिल सोसाइटी मध्ये ठाकचन्द मुंगुसमारे निर्विरोध अध्यक्ष निर्वाचित

*नाकाडोंगरी को-ऑपरेटीव राईस मिल सोसायटीच्या अध्यक्षपदी किसान विकास पॅनलचे ठाकचंद मुंगुसमारे व उपाध्यक्षपदी नंदलाल गौपाले यांची बिनविरोध निवड*

नाकाडोंगरी (ता. आष्टी, जि. भंडारा) दि. 2 जुलै 2025 रोजी नाकाडोंगरी को-ऑपरेटीव राईस मिल सोसायटी लि. नाकाडोंगरी येथे नुकतीच झालेल्या निवडणुकीत *किसान विकास पॅनल बहुमताने विजयी झाले होते. सोसायटीच्या अध्यक्षपदी ठाकचंद आत्माराम मुंगुसमारे यांची तर उपाध्यक्षपदी नंदलाल मोडकु गौपाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.* या प्रसंगी संस्थेचे संचालक, स्थानिक मान्यवर, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. *नूतन अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून पारदर्शक व सहकार्याला प्रोत्साहन देणारे कार्य करण्याचे आश्वासन दिले.* संस्थेच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नवनवीन योजना राबविण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच *संचालक मंडळ व सर्व शेतकरी सभासद बंधू भगिनींचे त्यांनी आभार मानले.*

यावेळी *नाकाडोंगरी को-ऑप. राईस मिल सोसायटीचे संचालक खुशाल पुष्पतोडे (अध्यक्ष – विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, नाकाडोंगरी), अनिल गौपाले, दिलीप वाघाडे, पुरुषोत्तम गौपाले, सचिन गेडाम, ईश्वर गौपाले, रुपचंद सोनवाने, योगीताताई बन्सोड, मायाताई गौपाले* तसेच *राजुभाऊ देशभ्रतार (जिल्हा परिषद सदस्य, आष्टी क्षेत्र), शिशुपाल गौपाले (उपसभापती, पंचायत समिती, तुमसर), गिरधारी देशमुख, अजय गहाणे, श्रीराम पुष्पतोडे, नरेंद्र गौपाले, सेवक गौपाले, संजय गौपाले, शालीक गौपाले, विजय बन्सोड, विजय मालाधारी, कमलेश गौपाले, विजय राऊत, संजय गौपाले (सचिव/मॅनेजर), हितेश गौपाले* यांची उपस्थिती होती.

1
265 views