logo

विभागीय अधिकारी त्रिभुवन मॅडम यांना युवक काँग्रेसच्या वतीने ना. रोड बिटको रुग्णालयाचे आरोग्याच्या समस्यांचे निवेदन देण्यात आले.

नाशिक महाराष्ट्र ए आय एम ए मिडीया दि. 01/7/2025 रोजी आज नासिक पुर्व विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने नाशिकरोड विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन मॅडम यांना बिटको रुग्णालय येथील सोनोग्राफी त्वरित सुरु करणे, औषधांचा तुटवडा भरून काढणे, बिटको रुग्णालय तर्फे घेतली जाणारी रु.10 फी बंद करावे आणि विविध तपासण्या, एक्सरे मोफत करावे, तसेच साप चावल्या नंतर लागणारे औषध आणि आपत्कालीन परिस्थितीत लागणारे औषध त्वरित उपलब्ध करावे याबाबत निवेदन देण्यात आले तसेच नवनिर्वाचित विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नासिकपुर्व विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जावेद पठाण, नासिकरोड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुसुमताई चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष हिरे,सोशल मीडिया पुर्व विधानसभा अध्यक्ष उमेश दासवानी, महिला शहर सरचिटणीस सारिका किर, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव राहुल सूर्यवंशी,अल्पसंख्यांक काँग्रेसचे मा. अध्यक्ष मोबिन पठाण,विधानसभा उपाध्यक्ष बंटी दासवाणी, विधानसभा उपाध्यक्ष किशन दुशिंग, अल्पसंख्यांक काँग्रेस पदाधिकारी तन्वीर शेख, मिथुन पगारे,विधानसभा सरचिटणीस सुनील शिंदे, शकीला शेख, अरमान शेख, विधानसभा उपाध्यक्ष अझरोद्दीन शेख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा जावेद पठाण यांनी दिला.

20
1620 views